मुंबई : भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचनिमित्तानं तुम्हाला कदाचित माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत... 


- आरबीआयचं सेंट्रल ऑफिस अगोदर कलकत्यात होतं १९३७ साली हे मुंबईमध्ये हलवण्यात आलं होतं. 


- आत्तापर्यंत आरबीआयला २३ गव्हर्नर लाभलेत. यातील सर्वात जास्त काळ या पदावर कार्यरत असलेले गव्हर्नर म्हणजे बेनेगल रामा रावं... १ जुलै १९४९ ते १४ जानेवारी १९५७ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. 


- जवळपास १४.९९ लाख करोड रुपये जनतेकडे आहेत.


- सध्या जवळपास १५.४९ लाख करोड रुपयांचे नोट सर्क्युलेशनमध्ये आहेत. 


- तर जवळपास २१,३०६ करोड रुपयांची नाणी चलनात आहेत. 


- भारताकडे २३.२२ लाख करोड रुपयांचा  परकीय चलनाचा साठा आहे.
 
- आरबीआयकडे ११७ लाख करोड रुपयांचं सोनं राखीव आहे.