मुंबई : सहकारी बँकांना अखेर दिलासा देणारा निर्णय़ आरबीआयनं घेतलाय.  पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.


 यासंदर्भात आरबीआयनं परिपत्रक काढल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिलीय. नोटाबंदीच्या निर्णय़ घेतल्यानंतर पहिल्या चार दिवसातच देशभरातल्या जिल्हा बँकांमध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपये जमा झाले होते. 
 
 एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्यामुळं संशयाचं वादळ निर्माण झालं होतं. त्यामुळं आरबीआयनं जिल्हा बँकांवर निर्बंध घातले होते.