जाता जाता काय बोलले आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन
आरबीआयचे गर्वनर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबरला संपत आहे. याआधी त्यांनी त्यांच्या शेवट्या भाषणात म्हटलं की, `सरकारमधील मोठ्या नेत्यांना नाही म्हणण्याची क्षमता आरबीआयने वाचवून ठेवली पाहिजे. देशाला एका मजबूत आणि स्वतंत्र केंद्रीय बँकेची आवश्यकता आहे. यासाठी असं करणं गरजेचं आहे.`
नवी दिल्ली : आरबीआयचे गर्वनर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबरला संपत आहे. याआधी त्यांनी त्यांच्या शेवट्या भाषणात म्हटलं की, 'सरकारमधील मोठ्या नेत्यांना नाही म्हणण्याची क्षमता आरबीआयने वाचवून ठेवली पाहिजे. देशाला एका मजबूत आणि स्वतंत्र केंद्रीय बँकेची आवश्यकता आहे. यासाठी असं करणं गरजेचं आहे.'
राजनने म्हटलं की, रिजर्व्ह बँकेला सरकारने ठरवलेल्या एका सिस्टीममध्ये काम करायचं आहे आणि ते अडचणीमुक्त नाही असू शकत. आपल्याया अजून थोडं आणखी पुढे जायचं आहे आणि रिजर्व बँक फक्त दिखाव्यासाठी नाही आहे. यासाठी रिजर्व बँकेकडे नाही म्हणण्याचा अधिकार आहे.
राजन यांनी हे देखील म्हटलं की, जी-20 सम्मेलनामध्ये अर्थमंत्र्यासोबत रिजर्व बँकेचे गव्हर्नर देखील बसतात. त्यांचं तेथे बसण्याचं एक कारण असतं. ते रिजर्व बँकेचे गव्हर्नर असतात. सरकारच्या सचिवांप्रमाणे ते काम नाही करत.
आरबीआयच्या गव्हर्नरला एवढी स्वतंत्रता असली पाहिजे की, ते देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीलाही असहमती दर्शवू शकतात. त्यांनी हे देखील म्हटलं की, रिजर्व बँकेकडे परिचालन संबंधीत निर्णय घेण्याचे देखील अधिकार असले पाहिजे.