नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, यूपी भाजपचे प्रभारी ओम माथुर आणि उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्या यांचा मिळालेल्या विजयामुळे सत्कार करण्यात आला.


बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की युवकांना सरकारमध्ये चांगल्या कामांसाठी राजदूत बनवलं गेलं पाहिजे. सरकारचे कामे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. देशाला प्रगतीशील बनवण्यासाठी काम करावं लागेल. ही जीत नाही जबाबदारी आहे. जनतेने आपल्याला ती जबाबदारी सोपवली आहे. आपल्याला जनतेच्या विश्वासावर खरे उतरायचे आहे.'


अनंत कुमार यांनी पुढे सांगितलं की, अमित शाह यांनी म्हटलं की, २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. त्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. यूपीसह जेथे ही विजय मिळाला आहे तेथे आणखी पुढे जाण्यासाठी काम करत राहायचं आहे.