मुंबई : टाटा समुहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिस्त्री यांना तडकाफडकी हटवण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांनी समुहातल्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत समुहाच्या काही व्यवसायांबाबत अप्रिय निर्णय घेतले पाहिजेत, असं म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही भूमिका रतन टाटा आणि एकूणच टाटा समूहाच्या धोरणांविरोधात आहे. मिठापासून ते संगणकापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या या 100 अब्ज डॉलर्सचा हा समूह आहे.


सायरस मिस्त्रींऐवजी रतन टाटांची चार महिन्यांसाठी अंतरिम चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच रतन टाटांच्या नेतृत्वाखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती चार महिन्यांमध्ये टाटा समुहासाठी नवा चेअरमन शोधणार आहे.