नोकरी : रेल्वेत तब्बल 18,000 जागांसाठी ऑनलाईन परिक्षा
रेल्वे भरती घोटाळा टाळण्यासाठी यंदा भारतीय रेल्वे वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 18 हजार जागा भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वे भरती घोटाळा टाळण्यासाठी यंदा भारतीय रेल्वे वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल 18 हजार जागा भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 92 लाख उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरता अर्ज दाखल केले होते. यापैंकी 2.73 लाख उमेदवारांनी प्राथमिक परिक्षा पास केली होती. त्यांना 17-19 जानेवारी रोजी लेखी परिक्षेसाठी बोलावण्यात आलंय.
रेल्वे भरती बोर्ड तिसऱ्या श्रेणीच्या 18,252 पदांना भरण्यासाठी ऑनलाईन परिक्षा घेणार आहे. यामध्ये सहाय्यक स्टेशन मास्तर, गार्ड, चौकशी - सहआरक्षण लिपिक, वाणिज्यिक एप्रेंटिस आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक इत्यादी पदांचा समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सध्या रेल्वेत दोन लाख पदं रिक्त आहेत.