नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने राज्यातील लाल दिवा आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात २१ एप्रिलपर्यंत लाल आणि निळा दिव्याचा वापर पूर्णपणे संपवण्यात येईल अशी अपेक्षा आहे. अत्यावश्यक सेवा, फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलेंस, आर्मी आणि पोलिस वाहनांना हा नियम लागू नसणार आहे. व्हीव्हीआयपींचे सुरक्षा रक्षकही कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


लाल आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धन्यवाद मानले आहे.