दिल्ली :  दिल्लीच्या पूसा कॅम्पसमध्ये शेतकरी मिळावा सुरू आहे, यात एका रेड्याची चर्चा आहे, कारण या रेड्याची किंमत हा चर्चेचा विषय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील हा रेडा आपल्या मालकाला वर्षाला ५० लाख रूपये कमवून देतो, या रेड्याच्या विर्याला चांगली किंमत आहे, या रेड्याचं नाव युवराज ठेवण्यात आलं आहे, युवराजला या प्रदर्शनात ९ कोटी रूपयांना मागणी आली होती, पण मालकाने विकण्यास नकार दिला.


युवराजच्या मालकाची कमाई युवराजच्या विर्याने चालते, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यात त्याला मागणी आहे, तो मुऱ्हा जातीचा आहे, त्याला पंजाबमधील कृषी मेळाव्यातून खरेदी करण्यात आलं होतं. 


या रेड्याचा रोजचा खर्च ३ हजार रूपये आहे, ८ वर्षाचा युवराज ५ फूट ९ इंच उंच आहे, त्याचं वजन १४ क्विंटल आहे. त्याला पिण्यासाठी दररोज २० लीटर दूध आणि जवळ-जवळ १९ किलो खाद्य लागतं, यानंतर युवराजला ४ किलोमीटरची पायपीट करवण्यात येते.


युवराजचं ४ ते ६ मिलीलीटर वीर्य साठवलं जातं, त्याचे ५०० ते ६०० डोस बनवण्यात येतात. मालक कर्मवीर हे स्पर्म आपल्या घरात मायनस १९६ डिग्री सेल्सिअसला तापमानावर ५० लीटर लिक्विड नायट्रोजन कंटेनरमध्ये स्टोअर करतात. युवराजला २२ देशांमधील प्रदर्शनात बोलावणं आहे.