जीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा
देशात जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी सोमवारी राज्य जीएसटी, केंद्रशासितप्रदेश जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि जीएसटी नुकसान भरपाई विधेयक ही चार विधेयकं लोकसभेत सादर केली होती. त्यावर आज चर्चा होणार आहे. त्यासाठी कामकाजाचे आठ तास राखून ठेवण्यात आले आहेत. या चर्चेला भाजपच्या खासदारांनी उपस्थित राहवं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : देशात जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी सोमवारी राज्य जीएसटी, केंद्रशासितप्रदेश जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि जीएसटी नुकसान भरपाई विधेयक ही चार विधेयकं लोकसभेत सादर केली होती. त्यावर आज चर्चा होणार आहे. त्यासाठी कामकाजाचे आठ तास राखून ठेवण्यात आले आहेत. या चर्चेला भाजपच्या खासदारांनी उपस्थित राहवं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काल झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत अरुण जेटलींनी सर्व खासदारांना जीएसटीच्या फायद्यांसंदर्भात माहिती दिली. ही चारही विधयेकं अर्थ विधेयकं म्हणून मांडण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यसभेची मंजूरी बंधनकारक नाही. लोकसभेत मंजूरी मिळाली, की राज्य जीएसटी विधेयक सर्व राज्यांच्या विधानसभेत मंजूरीसाठी पाठवण्यात येईल. १ जुलैपासून देशात अप्रत्यक्ष करांची ही नवी प्रणाली लागू करण्याचा सरकार मानस आहे.