नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे.  यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी  सेवा  वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएलचे चेअरमन आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार या कराराने दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहे. तसेच दोघांना एकमेकांच्या नेटवर्कचा फायदा होणार आहे. बीएसएनएल आपले नेटवर्क मजबूत करत आहेत त्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.  यानंतर ४ जी हँडसेट असणाऱ्या बीएसएनएलच्या ग्राहकांना जिओची ४ जी सेवा वापरता येणार आहे. 


यासाठी दोन्ही कंपन्या आपले दर निश्चित करणार आहेत. बीएसएनएल ही ग्रामीण भागात सर्वाधिक  मजबूत स्थितीत आहे. संपूर्ण देशात ग्राहक संख्येत बीएसएनएल ही पाचवी सर्वात मोठी  कंपनी आहे.