मुंबई : आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.


खोटं वाटत असेल तर रिलायन्स जिओचं हे ट्विट पाहा... ग्राहकांसाठी मोफत कॉल आणि इंटरनेटची सुविधा देऊन रिलायन्स जिओनं आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तोंडाला अगोदरच फेस आणलाय. आता मात्र या कंपन्यांशी संबंध सुधारण्याच्या नादात जिओनं ट्विटरवर या कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या म्हणजेच प्रेमाच्या शुभेच्छा दिल्यात.