नवी दिल्ली : बोगस डिग्री प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने स्मृती इराणी यांच्याविरोधातील ही याचिका रद्द केली आहे. शैक्षणिक योग्यतेबाबतीत चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने याचिकाकर्त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ११ वर्षानंतर का तक्राक करण्यात आली म्हणजेच मंत्र्यांना त्रास देण्याच्या हेतूने ही तक्रार केली गेल्याचं कोर्टाने म्हटलंय.


स्मृती इराणींनी ३ निवडणुकांमध्ये शिक्षणाबाबतीत प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अहमर खान यांनी ही याचिका दाखल केली होती.  स्मृती इराणी यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी शैक्षणिक माहिती दिल्याचा त्यांचा आरोप होता. एका प्रतिज्ञापत्रात इरानी यांनी बीए असल्याचं तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात बीकॉम असल्याची माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलंय.