राम मंदिर प्रश्नावर तोडगा काढा : सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
त्यामुळे देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा निर्णंय येत्या काही दिवसातच येण्याची शक्यता आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या वाद कोर्टाबाहेर सामंजस्याने का सोडवला जाऊ शकत नाही, असा प्रश्न आज देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती जेएस खेहर यांनी विचाराला.
राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. दोन्ही पक्षांनी चर्चेतून विषय सोडवावा, गरज पडली तर न्यायालय मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे, असंही खेहर यांनी म्हटले आहे. न्यालयाचे काही न्यायमूर्ती मध्यस्थीसाठी राखून ठेवायला आम्ही तयार आहोत असं सरन्यायधीशांनी म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी 31 मार्चच्या आत सुनावणी करण्यात येईल असंही कोर्टानं म्हटले. 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं हिंदूंना वादग्रस्त बाबरी मशीदीच्या जागी तात्पुरते मंदिर बांधण्याचा अधिकार आहे असा निकाल दिला होता. या निर्णयसाठी खंडपीठानं पौराणिक दंतकथांचा आधार घेतला. त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतरांनी पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.