नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जेव्हा छत्‍तीसगढची राजधानी रायपूरला पोहोचले तेव्हा त्यांनी फोटोग्राफी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या कॅमेरामध्ये वाघाचे फोटो टिपले.


छत्‍तीसगढ फाउंडेशन डेच्या निमित्ताने मोदी रायपूर येथे पोहोचले होते. पीएम मोदींनी पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचं लोकार्पण केलं. या दरम्यान त्यांनी राज्‍याचे मुख्‍यमंत्री रमन सिंह यांच्यासोबत नंदन वन जंगलाची सफर केली. येथे त्यांनी वाघाच्या एका पिंजऱ्याजवळ जात त्याचे फोटो काढले. पंतप्रधानांनी अगदी जवळ जावून त्या वाघाचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला.