नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या घरी चोरी झाली आहे. दिल्ली येथील घरामध्ये 29 नोव्हेंबरला ही चोरी झाल्याचं समोर येतंय. अनेक महागड्या वस्तू चोरी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला चष्मा देखील चोरीला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थरूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण अजून चोर हाती लागलेले नाहीत. स्पेशल स्टाफ आणि क्राइम ब्रांचची एक टीम याची चौकशी करत आहेत. सुरक्षित अशा जागी थरुर यांचं हे घर आहे.


थरूर यांनी म्हटलं आहे की, भिंतीवरुन चोर आतमध्ये आले आणि गेट तोडून त्यांच्या ऑफीसमध्ये घुसले. नटराजची मूर्ती, गणेशाच्या 12 मूर्ती, हनुमानची  10 मूर्ती चोरीला गेल्याचं म्हटलं आहे. मंदिरातून देखील काही वस्तू चोरीला गेल्याचं त्यांनी म्हटलंय. 32 जीबीचे 12 पेनड्राइव, एक इंटरनेट डोंगल देखील चोरीला गेलं आहे. पीएम मोदींनी स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी झाल्याने त्यांना एक गांधी चश्मा दिला होता तो देखील चोरीला गेला आहे.