नवी दिल्ली : नोटबंदीनंतर पुन्हा एकदा मोदी सरकारने अच्छे दिन दाखवलेत. ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.


Latest Updates


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18:10 PM


रेल्वेतील जेवणावर, विश्रामगृह, वेटिंग रुमवर ५ टक्के सवलत


18:07 PM
किसान क्रेडीट कार्डधारकांना रुपे कार्ड उपलब्ध करुन देणार


18:05 PM
नवीन विमा पॉलिसी काढणाऱ्यांना सुट देणार


18:02 PM
नवी दिल्ली : ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाइप मशीन आणि मायक्रो एटीएमची संख्या वाढवली जाईल - जेटली


17:53 PM
नवी दिल्ली : टोलनाक्यांवर ऑनलाइन टोल भरणाऱ्यांना 10 टक्के सवलत मिळेल - जेटली


17:52 PM
नवी दिल्ली : जनरल आणि जीवन विम्याचा ऑनलाइन भरणा केल्यास प्रिमियममध्ये मिळणार दहा टक्के सवलत - जेटली


17:51 PM   
नवी दिल्ली :  डिजिटल माध्यमातून पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना 0.75 टक्के सवलत - जेटली


17:50 PM   
नवी दिल्ली : 1 जानेवारी 2017 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेपासून होणार सुरुवात, तसेच डिजिटल माध्यमातून तिकीट खरेदी करणाऱ्यांना मिळणार अपघात विमा - जेटली


17:49PM   
नवी दिल्ली :  नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण आणि सहकारी बॅंकांचे खातेदार असलेल्या आणि किसान कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रूपी कार्ड देणार - जेटली


17:48 PM   


नवी दिल्ली : 2000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही सर्व्हिस चार्ज नाही


17:47 PM   


नवी दिल्ली :  रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पास डिजिटल माध्यमातून खरेदी केल्यास मिळणार सवलत - जेटली


17:47 PM   
नवी दिल्ली :  अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण कमी करण्यात येईल - अरुण जेटली