देशातली 65 हजार 250 कोटींची काळी संपत्ती जाहीर
सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्किमला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्किमला चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत 65,250 कोटींची काळी संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. हैदराबाद शहरातून सर्वाधिक काळी संपत्ती जाहीर करण्यात आलीय. हैदराबादहून 13 हजार कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली.
तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून 8 हजार 500 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतून 6 हजार कोटी आणि कोलकात्त्यातून 4 कोटींची संपत्ती जाहीर करण्यात आली.
देशातल्या 64,275 जणांनी त्यांच्याकडे ही काळी संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. या सगळ्यांची नावं गुप्त ठेवण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे. आत्ता ही आकडेवारी 65,250 कोटी असली तरी ऑनलाईन आणि इनकम टॅक्स ऑफीसमध्ये जाऊन जाहीर केलेली संपत्ती याची बेरीज केल्यावर आणखी जास्त रक्कम होईल असं अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले आहेत.
या 65,250 कोटी रुपयांवर 45 टक्के टॅक्स आणि दंड घेण्यात येणार आहे. काळी संपत्ती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारनं इनकम डिक्लेरेशन स्कीमची घोषणा केली होती. या स्कीम अंतर्गत काळा पैसा घोषीत करण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. ही मुदत 30 सप्टेंबरला म्हणजे काल संपली.