नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, नोटाबंदीनंतर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचे काळा पैसा बाहेर येईल अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र त्याहूनही अधिक रक्कम जमा झालीये. 


सध्या ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे ते लोक ते पांढरा कऱण्याच्या मागे लागलेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार वेळोवेळी पावले उचलत आहेत. 


नोटाबंदीनंतर अचानकपणे जनधन खात्यातील रक्कमही वाढू लागल्याने सरकारने त्याबाबतची नियम बनवलेत. तसेच पैसे भरणे वा काढणे यावरही मर्यादा घालण्यात आल्यात.