नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी नोटाबंदीचं जोरदार समर्थन करताना 2 हजाराच्या नोटा येत्या पाच वर्षात बंद होतील असा विश्वास व्यक्त केलाय. 2 हजाराच्या नोटा ही तात्पुरती तरतूद आहे. त्यांचा उपयोग संपला की या नोटा बंद होतील असं त्यांनी दिल्लीत म्हटलंय.


नोटाबंदीचा निर्णय हा पोखरणच्या अणूचाचणी इतकाच दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याचंही गुरूमूर्तींचं म्हणणं आहे.  डॉ. मनमोहन सिंहांनी नोटाबंदीचा निर्णय व्यवस्थापनाची ऐतिहासिक चूक असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना गुरूमूर्तींनी यूपीएची दहा वर्ष हीच एक ऐतिहासिक चूक असल्याचं म्हटलंय. यूपीएच्या काळात जो आर्थिक विकास झाला, त्यातून अत्यल्प रोजगार निर्मिती झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच देशातली औद्योगिक क्षेत्राची वाताहत झालीय.  मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे यूपीएच्या चूका दुरुस्त करण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे, असंही गूरुमूर्ती  यांनी म्हटलं आहे.