१५९० रुपयांच्या डिजीटल पेमेंटवर १ कोटींचा जॅकपॉट
सरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतलेत. अधिकाधिक लोकांनी डिजीटल पेमेंट करण्यासाठी सरकारने अनेक ऑफरही जाहीर केल्यात. सरकारने जाहीर केलेल्या अशाच एका ऑफरचा लाभ एका व्यक्तीला मिळालाय. या व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.
नवी दिल्ली : सरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतलेत. अधिकाधिक लोकांनी डिजीटल पेमेंट करण्यासाठी सरकारने अनेक ऑफरही जाहीर केल्यात. सरकारने जाहीर केलेल्या अशाच एका ऑफरचा लाभ एका व्यक्तीला मिळालाय. या व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.
सरकारने डिजीटल पेमेंटला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींना लकी ड्रॉ द्वारे बक्षीस जाहीर केले होते. यामध्ये एका व्यक्तीला तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झालेय.
मिळालेल्या माहितीनुसार, लकी ड्रॉमध्ये तीन व्यक्तींना बक्षीस मिळालेय. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकाने तब्बल १५९० रुपयांचे डिजीटल पेमेंट केले होते. त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.
लकी ड्रॉमधील दुसऱ्या विजेत्या व्यक्तीला ५० लाख रुपये तर तिसऱ्या ग्राहकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळालेय. दरम्यान, या विजेत्यांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाहीये.