नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील भारत विरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रकरण सध्या देशातील चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांकडून यावरून तिखट प्रतिक्रिया येत आहे. त्यातच आता नेहमी वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी या वादग्रस्त प्रकरणात उडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोषी विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे असे मत भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केलं आहे. 'जेएनयु'मध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे परखड मत साक्षी महाराज यांनी व्यक्त केलं आहे.


'देशद्रोह्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवण्यापेक्षा त्यांना फासावर लटकवा नाहीतर पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे मी याआधीपासूनच म्हणत आलो आहे. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती. आता हा दहशतवाद 'जेएनयु' सारख्या जागतिक स्तरावरील महाविद्यालयात देखील पोहोचला आहे. देशाचा अपमान कोणत्याही प्रकारे सहन केला जाऊ शकत नाही, असंही साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.