`4 बायका, 40 मुलं जन्माला घालणारे लोकसंख्यावाढीला जबाबदार`
भाजपचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेत.
मेरठ : भाजपचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेत. धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं विधानं केल्याप्रकरणी साक्षी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेरठ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.
देशात चार बायका आणि 40 मुलं जन्माला घालाणारेच लोकसंख्या वाढीला जबाबदार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. लोकसंख्या नियंत्रणात ठेवायची असेल तर कठोर कायद्यांची गरज असल्याचंही विधान साक्षी महाराजांनी यावेळी केलं.
उत्तर प्रदेशात सध्या निवडणूक आचार संहिता लागू आहे. त्यामुळे अशावेळी साक्षी महाराजांनी हे विधान करून स्वतः आणि पक्ष दोघांनाही चांगलचं अडचणीत आणलंय.