मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ट्विटरद्वारे खडे बोल सुनावले आहेत. उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी सलीम खान यांनी नवाज शरीफाना फटकारत नाराजी दर्शवली आहे. या पोस्टमध्ये सलीम खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बे-नवाज शरीर म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाकिस्तानात तुमचं कोणी ऐकत नाही. संसद आणि देशातले लोकं तुमचं ऐकत नाहीत. कदाचित तुमचं कुटूंबसुध्दा तुमचं ऐकत नसतील. आणि ही खुप विचित्र गोष्ट आहे की तुम्ही भारताची तक्रार इतर देशात करत फिरत आहात' अशा शब्दात सलीम खान यांनी उरी हल्ल्याचा निषेध ट्विटरवरुन केला आहे.


18 सप्टेंबरला झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे