जोधपूर : अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यातूनही सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपूर कोर्टाचे न्यायाधीश दलपत राजपुरोहित यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा निकाल दिला. 


1998 पासून सुरू असलेल्या चार खटल्यांपैकी तीन खटल्यामध्ये सलमानची निर्दोष मुक्तता झालीय. आज सलमान सोबत त्याची बहीण अलविराही निकालाच्या वेळी कोर्टात हजर होती.


निकालाआधी कोर्टाबाहेर सलमानच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली.1998 साली सलमान खाननं एका चिकांरा जातीच्या हरणाची आणि दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये खटला दाखल करण्यात आला.


 तेव्हापासून सलमान खानवर एकूण चार खटले सुरू होते. त्यापैकी चिंकारा जातीच्या हरिणाची शिकार केल्याप्रकरणी दाखल दोन खटल्यांमध्ये सलमानची राजस्थान हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.


 तिसरा दोन काळवीटांच्या शिकारीचा खटला अजूनही सुरू आहे.  तर चौथ्या अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या खटल्यावर आज जोधपूरमध्ये निकाल देण्यात आला.