नवी दिल्ली : माछिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या ५  जवानांना आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्ली विमानतळावर मानवंदना दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माछिलच्या हिमस्खलनातील शहीद सुपुत्रांमध्ये सांगलीचे रामचंद्र माने, वाईचे गणेश ढवळे आणि परभणीचे बालाजी अंबोरे हे महाराष्ट्राचे तीन सुपुत्र शहिद झालेत. 


त्यानंतर या तीन जवानांचे पार्थिव नागपूरकडे रवाना करण्यात आलीय. आत्तापर्यंत  हिमस्खलनाच्या दोन घटनांमध्ये १९ जवान शहीद झाले आहेत त्यापैकी महाराष्ट्रातले ६ जवान आहेत.


शहीद जवानांच्या गावावर शोकळळा


माछिल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात शहीद झालेले साता-यातले जवान गणेश ढवळे यांच्या घरी आक्रोश सुरु आहे. २९ वर्षीय गणेश यांच्या मृत्यूच्या बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. गणेश यांच्या मागे पाच महिन्यांचा मुलगा, पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे. गणेश य़ांच्या निधनाच्या बातमीनंतर साता-यातील अनेक प्रशासकीय अधिका-यांनी भेट दिलीय.


 परभणी जिल्ह्याचे सुपुत्र बालाजी आंबोरे शहीद झाल्याची बातमी ताडकळस येथे पोहचताच गाव पूर्ण बंद ठेवण्यात आलंय. आणि महत्वाचं म्हणजे बालाजी यांच्या निधनाची माहिती बालाजी यांचे आई, वडील आणि आठचं महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या त्यांच्या पत्नीला सांगण्यात आली नाही. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येतीय.