17 वा कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना आदरांजली
भारतीय लष्कराकडून 26 जुलैला 17 वा कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. तिथेच हा सलामीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडून 26 जुलैला 17 वा कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. तिथेच हा सलामीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.
लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी सोमवारी युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. 26 जुलै 1999 ला ऑपरेश विजय सफल झालं होतं. या युद्धामध्ये 527 हून अधिक जवान शहीद झाले होते. तर 1300 जवान जखमी झाले होते. त्यांना लष्कराकडून श्रद्धांजली वाहण्यात येते.