लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची युती होणार आहे. काँग्रेस 105 जागांवर लढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या युतीसंदर्भातली सगळी बोलणी थेट प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये झाली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनीच यासंदर्भातलं ट्विट केलंय. 


दरम्यान, सपा घाबरल्यामुळेच काँग्रेसशी युती केल्याची टीका भाजपनं केलीय तर सपा आणि काँग्रेसची युती म्हणजे गठबंधन नव्हे तर ठगबंधन असल्याची प्रतिक्रिया बसपानं दिलीय.