मुलं कोणाकडून खेळतील भारत का पाकिस्तान, सानिया मिर्झाचं मन जिंकणारं उत्तर...
भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्जा आणि तिचा पती शोएब मलिक हा एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.
नवी दिल्ली: भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्जा आणि तिचा पती शोएब मलिक हा एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.
'यारो की बारात' या टिव्ही शोच्या दरम्यान भारताची प्रसिद्ध टेनसपटू आणि तिची जवळची मैत्रिण बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोपडा एकत्र आल्या होत्या.
बॉलीवूड अभिनेता आणि 'यारो की बारात' शोचा होस्ट साजिद खानने शो दरम्यान सानियाला विचारला की, मी पाकिस्तान आणि भारताच्या सर्व लोकांतर्फे एक प्रश्न विचारू इच्छितो की, तुमच्या लग्नाला सहा वर्ष झाली आहेत आणि तुम्हाला आता मुल पण होणार आहे. जर तुमच्या मुलाला खेळाडू बनण्याची इच्छा असेल, तर तो भारतासाठी खेळेल की पाकिस्तानसाठी खेळेल?
सानियाला प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली की, 'खर सांगू, आमच्या दोघांमध्ये या विषयावर काही चर्चा नाही झाली, आम्हाला माहीत नाही, असं पण होऊ शकत आमच्या मुलाची खेळाडू सोडून एक्टर, शिक्षक किंवा डॉक्टर बनण्याची इच्छा असू शकते. हा खूप दूरचा विचार आहे. मला हिंदूस्तानी असल्याचा गर्व आहे. शोएब पाकिस्तानी आहे, परंतु आम्हाला पती-पत्नी असल्याचा अभिमान आहे. लोकांच मत आहे की सानियाने या उत्तराने पाकिस्तान आणि भारतीयांचे मनं जिंकली आहेत.