मुंबई : आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काही लोकांनी जाणून बुजून शिवसेना किंवा भाजपच्या लोकांच्या सांगण्यावरून पक्षाच्या कामकाजाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं खूप उघडपणे सुरू होतं... आणि याची माहिती मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच होती' असं धक्कादायक वक्तव्य संजय निरुपम यांनी केलं. 


यावेळी संजय निरुपम यांनी कुणाचंही नाव घेतला नाही पण, 'संजय निरुपमला हरवायचंच असं काही लोकांनी ठरवलंच होतं... पण, त्यांना हे कळत नव्हतं की केवळ संजय निरुपम नाही तर पक्ष हरत होता... हे निष्ठावंत नेत्याचं काम असं असू शकत नाही' अशा शब्दांत निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 


महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच संजय निरुपम यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय.