तिरुवनंतपूरम : केरळ सोलर पॅनेल प्रोजक्ट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सरिता एस नायर यांनी न्यायालयात मोठा गौप्यस्फोट केलाय. सरिताने उच्च न्यायालयात सांगितले, टेंडर मिळविण्यासाठी माझा सेक्ससाठी वापर नेत्यांसह गार्डपर्यंत केला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरिताने एक याचिका दाखल करत या घोटाळ्याप्रकरणी केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांचे सिंहासन डळमळीत झालेय. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुळे ते अडचणीत आलेत. सरिताने म्हटलेय, सेक्ससाठी माझा वापर राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि खासगी सेक्रेटरीपासून गार्डपर्यंत केला गेला. निवडणुकीपूर्वी हा मामला आल्याने केरळमध्ये खळबळ उडालेय.


सरिताने एका याचिकेत आरोप केलाय की, राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास समितीचे एक प्रमुखाने सोलर प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी उद्योगपती एम श्रीधरन नायरला कथित प्रकरणी राजी करण्यासाठी केरळचे मुख्यमंत्र्यांची चौकशी केली गेली नाही. टीम सोलर रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्सची एक संचालक आणि या प्रकरणातील आरोपी सरिताने मुख्यमंत्री कार्यालयाला कंपनीला जोडण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले श्रीधरन नायर यांनी मुख्यमंत्र्यासोबत मिळून मेगा सौर योजना ४० लाख रुपये सुरुवातीला गुंतवणूक करण्याचा विश्वास दिला.


याआधी एका पत्रकार परिषदेत सरिताने खुलासा केला की, निविदा मिळविण्यासाठी आणि नेत्यांना जवळ आणण्यासाठी गार्डसह सचिव यांच्याशी सेक्स संबंध ठेवायला लागायचे. 


३६ वर्षांची सरिता ही 'सोलर सरिता' या नावाने ओळखली जात आहे. तसेच तिला हाय प्रोफाईल लायजनर बोलले जाते. आपला वापर करुन ती अनेक कंपनींना सरकारी कंत्राट मिळविण्यासाठी मदत करायची, असा तिच्यावर आरोप ठेवण्यात आलाय. तिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला २००५ मध्ये अटक करण्यात आलेय. सरिता ही १०वीत टॉप आहे. तिचे इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम आदी भाषेवर प्रभुत्व आहे. सरिताचे लग्न दुबीतील राजेंद्र यांच्याशी झाले. त्यावेळी वय होते १८ वर्ष. त्यानंतर घटस्फोट झाला. तिला एक मुलगा आहे.