बंगळुरु : बेहिशोबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी शशिकला नटराजन यांनी बुधवारी बंगळुरुच्या स्पेशल कोर्टात सरेंडर केलं. आता त्या तुरुंगात कैदी नंबर १०७११ नावाने ओळखल्या जातील. सुप्रीम कोर्टाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.


सुरक्षेच्या कारणास्तव बंगळुरु पोलिसांनी त्यांना अग्रहारा जेलमध्ये पाठवण्याची विनंती केली होती. शशिकला यांनी तेथेच सरेंडर केलं. याआधी त्यांचं मेडिकल चेकअप झालं. या प्रकरणातील तिसरे आरोपी सुधाकरन कोर्टात नाही पोहोचले. इलावरसी आणि सुधाकरन हे शशिकला यांचे नातेवाईक आहे आणि ते ही या प्रकरणात दोषी आहेत. शशिकलांना प्रकृती अस्वस्थाचं कारण देत सरेंडरसाठी २ आठवड्यांचा वेळ मागितला होता पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळली.