चेन्नई : एआयएडीएमकेच्या जनरल काउन्सिल बैठकीच्या पूर्वसंध्येला चेन्नईतल्या पक्ष कार्यालायसमोर जोरदार राडा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआयएडीएमकेतून निलंबित केलेल्या खासदार शशीकला पुष्का यांच्या पतीला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. यात ते जखमी झाले.


एआयडीएमकेच्या जनरल सेक्रेटरीपदाच्या निवडीसाठी जनरल काउंसिलची गुरुवारी बैठक होणार आहे. या पदासाठी खासदार शशीकला पुष्का इच्छुक आहेत. त्यांनी दिवंगत जयललिता यांच्या निकटवर्तीय शशीकला नटराजन यांच्या निवडीला विरोध केलाय.


विरोध करून शशिकला पुष्पा या कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एआयएडीएमकेच्या नेत्यांनी केलाय. त्यामुळं भडकलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पतीला बेदम मारहाण केली.