कचरा पेटीत मिळालेली डेडबॉडी अभिनेत्रीची, नवऱ्याला अटक
एक महिना आधी चेन्नईतल्या एका कचराकुंडीमध्ये महिलेची डेडबॉडी सापडली होती. या डेडबॉडीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चेन्नई: एक महिना आधी चेन्नईतल्या एका कचराकुंडीमध्ये महिलेची डेडबॉडी सापडली होती. या डेडबॉडीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही डेडबॉडी अभिनेत्री ससिरेखाची आहे.
जानेवारी महिन्यामध्ये चेन्नईच्या रामापूरम भागात कचराकुंडीमध्ये डोक नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी तपास केल्यानंतर तो मृतदेह टीव्ही अभिनेत्री ससिरेखाची असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ससिरेखाच्या नवरा रमेशला अटक केली आहे. याबरोबरच तिच्यासोबत चित्रपटामध्ये काम करणाऱ्या काशिव यालाही अटक करण्यात आली आहे.
रमेश काशिव आणि ससिरेखाच्या प्रेमामध्ये हा खून करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ससिरेखा गायब झाल्यानंतर तिचा नवरा रमेश पोलिसांना गुंगारा देत होता.