नवी दिल्ली : येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोटाबंदीनं त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता स्टेट बँकेच्या अहवाल व्यक्त करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक आयकर दात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून तीन लाख करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय आय़कर कायद्यातल्या कलम 80 सी अंतर्गत करमुक्त गुंतवणूकीच्या रकमेतही दीड लाखांवरून दोन लाख करण्यात येईल असंही स्टेट बँकच्या अहवालात म्हटलंय.  


शिवाय सध्या गृहकर्जावर भरलेल्या व्याजापैकी दोन लाखांची रक्कमेची एकूण उत्पन्नातून वजावट मिळते. ही वजावट वाढवून तीन लाखांपर्यंत नेण्याचीही घोषणा अरुण जेटली करतील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.


याव्यतिरिक्त बँकेत सलग पाच वर्षांसाठी ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींची रक्कम करमुक्त असते. त्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा तीन वर्षांवर आणली जाईल असंही अहवालात म्हटलंय.,