भोपाळ  :  कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुषोत्तम व्यास असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ४५ वर्षांचे होते. भोपाळच्या रतीबाद शाखेमध्ये काम करत असताना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पुरुषोत्तम यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. 


मोदींच्या निर्णयानंतर बँक कर्मचाऱ्यांना दोन दिवस अतिरिक्त काम करावे, या कॅशियरला या अतिरिक्त कामामुळे ताण आला का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 
 
त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला. ५०० आणि १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रविवारीही सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका सुरू होत्या. 
 
नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी देशातील सर्वच बँकांसमोर मोठया रांगा लागल्या होत्या. बँकेचे कर्मचारी जास्तीत जास्त वेळ थांबून काम करत आहेत.