पहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी
पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.
मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या. रद्द झालेल्या या पाचशे आणि हजाराच्या नोटा नागरिकांना बँक आणि पोस्टामध्ये जमा करायच्या आहेत. दहा तारखेपासून या नोटा जमा करायला सुरुवात झाली आहे.
या नोटा जमा करण्यासाठी नागरिक बँकांबाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी करत आहेत. पाचशे आणि हजारच्या नोटा जमा केल्यामुळे एसबीआयच्या शाखेमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यातले सेव्हिंग अकाऊंटचे 11 हजार कोटी आणि करंट अकाऊंटचे सात हजार कोटी रुपये आहेत. एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे.