एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी...
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
एसबीआयमध्ये इतर सहा बँकांचं विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीला जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागणार आहे. म्हणजेच जवळपास २७ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.
एसबीआयमध्ये संबंधित बिकानेर तसंच जयपूर स्टेट बँक, म्हैसूर स्टेट बँक, त्रावणकोर स्टेट बँक, पटियाला स्टेट बँक, हैदराबाद स्टेट बँक आणि भारतीय महिला बँकेचं लवकरच विलिनीकरण होणार आहे.
एसबीआयमध्ये सध्या २ लाख ७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या विलिनीकरणानंतर यामध्ये ७० हजार कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे, एसबीआयची एकूण कर्मचारी संख्या २ लाख ७७ हजारांवर जाईल. डिजिटल सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विलिनीकरण होणार आहे.
येत्या दोन वर्षांत स्टेट बँकेत कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात होऊ शकते, असं एसबीआयचे महाव्यवस्थापक रजनीश कुमार यांनी म्हटलंय.