मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी जाहीर केली होती. या नोटाबंदीनंतर काळा पैसा मार्गी लावण्यासाठी एसबीआयच्या एका शाखेमध्ये तब्बल दोन हजार नवी खाती खोलण्यात आल्याचे समोर आलेय.
 
सीबीआयने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आलीये. या दोन हजार बॅंक खात्यांमध्ये आठ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयने काही बॅंक अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. सीबीआयने उत्तरप्रदेशमधील बरेली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेची दोन जानेवारीला तपासणी केली होती. 


त्यानुसार तेथे ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरच्या दरम्यान बँक अधिकाऱ्यांनी २,४४१ नवीन खाती बनवून घेतली होती.


या खात्यांमध्ये ६६७ बचत खाती, ५३ चालू खाती, ९४ जनधन खाती, ५० पीपीएफ, १,५१८ फिक्स डिपॉजिट, १३ इतर खाती तर २ जेष्ठ नागरिकांची खाती इत्यादी सरकारी खात्यांचा समावेश होता.