नवी दिल्ली : नोटबंदीनंतर रोख रक्कमेच्या समस्येपासून दिलासा मिळावा आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी म्हणून एसबीआय लवकरच गरीबांसाठी २५००० रुपयांपर्यंत लिमिट असलेला क्रेडिट कार्ड सेवा देणार आहे.


ग्राहकांकडे पैसे खर्च करण्याची आणि व्यवहारांची क्षमता असते पण त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही. त्यामुळे २ ते ३ महिन्यात बँक क्रेडिट कार्ड उपलब्‍ध करणार आहे. सरकारने नोटबंदीची घोषणा केल्यानंतर एसबीआय कार्डचा वापर वाढला आहे. बँकेला २० ते २५ टक्के ग्राहकांची संख्या वाढणार असल्याची आशा आहे. यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळणार आहे.