बीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं लोढा समितीच्या शिफारसी सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यात. या शिफारसी मान्य केल्यामुळे आता बीसीसीआयमध्ये वयोमर्यादा ही 70 वर्ष असेल.
लोढा समितीच्या शिफारसी मान्य केल्यामुळे आता बीसीसीआयमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी दरवाजे बंद झाले आहेत. त्याचप्रमाणे एक व्यकी एक पद असं काहीस चित्र आता बीसीसीआयमध्ये दिसेल. तसंच गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये रोटेशनल मतदानाची पद्धत दिसेल. भारतात बेटिंग अधिकृत करण्याबाबतचा निर्णय हा पार्लमेंटचा असेल, असं मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.