भिलवारा : राजस्थानमध्ये एक बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे नदीत पडली. या बसमधल्या ५० विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलकी नदी ही पुलाच्या 2 फूट वरुन वाहत होती. तरी ही सकाळी ७ वाजता या बसचालकाने बस त्या पुलावरुन नेण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात आला. 


या नदीजवळ काही गावकरी बसले होते. बस नदीत पडल्यानंतर ते गावकरी त्या दिशेने धावले. बसमधील जवळपास ५० विद्यार्थ्यांना त्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे बस नदीत बुडाली.