केजरीवाल आणि सिद्धू यांच्यात झाली सिक्रेट डील?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना २०१७ मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा चेहरा बनवणार असल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना २०१७ मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा चेहरा बनवणार असल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे.
अरविंद केजरीवाल आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामध्ये एक सीक्रेट डील झाल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील आणि निवडणूकही नाही लढवणार ते फक्त आपचे स्टार प्रचारक असतील.
दोघांमध्ये काय झाली डील
१. नवज्योत सिंग सिद्धू पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसतील.
२. सिद्धूंची पत्नी पंजाब विधानसभा निवडणूक नाही लढवणार आणि कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील.
३. सिद्धू दांपत्य संपूर्ण पंजाबमध्ये निवडणूक प्रचार करतील.
४. नवज्योत सिंग सिद्धू पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक नाही लढवणार.
सोमवारी सिद्धू यांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांनी तो स्वीकार केला आहे. २८ एप्रिलला सिद्धूंनी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली होती.