श्रीनगर : कश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस, आर्मी आणि अर्धसैनिक दलाने बारामुलामध्ये कारवाई करत ४० संशयितांना ताब्यात घेतलं आहे.


पोलिसांना यांच्याकडून पेट्रोल बॉम्ब, चीन आणि पाकिस्तानचे झेंडे, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबाचे लेटर हेड मिळाले आहेत. या लोकांकडून अनधिकृत मोबाईल फोन आणि हिंसा घडवून आणणारी राष्ट्रविरोधी प्रचार सामग्री देखील मिळाली आहे. लश्कर-ए-तैयबाकडून जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.