पुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.
जम्मू : जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.
या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला शुक्रवारीच मिळाली होती. त्यानंतर सैन्यानं ही कारवाई केली. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथील पंजगाम गावात ही चकमक झाली. हे सर्व दहशतवादी मुळचे काश्मीरचेच आहेत.
या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांकडून तीन एके-47 राफल्स आणि मोठ्याप्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आलीत. हे सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहदीन कमांडर बुरहान मुजफ्फराबादीच्या गटाशी संपर्कात होते. हे सर्व दहशतवादी काश्मीरचे स्थानिक असल्यामुळे या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीये.