नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार  भगवंत मान यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा सल्ला लोकसभेतील काही खासदारांनी दिला आहे.  भगवंत मान यांनी संसद परिसराचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्याने ते वादात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आप'साठी पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा सुरू असताना मान यांच्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे.


'मान हे संसदेत बऱ्याचदा मद्यधुंद अवस्थेत येतात. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसणारे सदस्यच त्याबाबत माहिती देतात. अशावेळी त्यांच्या शेजारी बसणे असह्य असते', अशा शब्दांत यापूर्वीच चंदू माजरा यांनी तक्रार केली होती. 


अकाली दलाचे चंदू माजरा, तसेच भारतीय जनता पक्षाचे महेश गिरी, 'आप'चे निलंबित खासदार हरिंदरसिंग खालसा यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना एक पत्र लिहिलंय.


पत्रात म्हटलंय, 'भगवंत मान यांना मद्य आणि अंमली पदार्थांचं व्यसन सोडविण्यास मदत करणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा. तेथे उपचार पूर्ण करूनच त्यांना संसदेत प्रवेश दिला जाव'.