नवी दिल्ली : सरकारने कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी २ हजार रूपयापर्यंतच्या कार्ड पेमेंटवर सर्विस टॅक्स घेणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधून २ हजार रूपयापर्यंतच्या रक्कमेवर आता सर्विस टॅक्स बसणार नाही आहे.
 
डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढल्यास रकमेवर १४ टक्के टॅक्स वसूल केला जात होता, परंतु आता सरकारच्या निर्णयामुळे २ हजारच्या कार्ड पेमेंट मागे लोकांचे २८० रूपये वाचणार आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजीटल ट्रांजेक्शनच्या माध्यमातून व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ऑनलाईन पेमेंट आणि कार्ड पेमेंट सारख्या अनेक पर्यायांना सोयीस्कर आणि आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करत आहे.