नवी दिल्ली : कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सी.एस. कर्नन यांनी देशाचे सरन्यायाधीश जे.एस. केहर यांच्यासह सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांना 5 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आपण दलित असल्यामुळे जाणून बुजून सुप्रीम कोर्ट सूड उगवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत न्या. कर्नन यांनी ही शिक्षा सुनावली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट आणि न्या. कर्नन यांच्यात जोरदार वाद आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याच्या प्रकरणामध्ये न्या. कर्नन यांना समन्स बजावल्यानंतर हा वाद उफाळला होता. कोर्टात आपल्या मानसिक संतुलनाचा मुद्दा काढणं हेदेखील अवमानना करणारं असल्याचा दावा न्या. कर्नन यांनी केला आहे.