भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमुलाग्र बदल होणार आहेत.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमुलाग्र बदल होणार आहेत. ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्व प्रकारच्या लेखी परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या भरती विभागाचे सहाय्यक महासंचालक डी.बी. पैनी यांनी याबाबत घोषणा केलीये. आतापर्यंत शारीरिक चाचणी आधी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेतली जात असे.
यापुढे ऑनलाईन लेखी परीक्षा आधी आणि नंतर फिजिकल टेस्ट होतील. लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल. यात चाळणी लागल्यामुळे कमी उमेदवार असतील आणि फिटनेस टेस्ट घेताना अधिक सुलभ होईल, असं पैनी म्हणाले. लेखी परीक्षेसाठी वेगळं स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलंय. त्यात अफरातफर करणं शक्य नसल्याचंही पैनी यांनी स्पष्ट केलंय. या वर्षअखेर किंवा पुढल्या वर्षात या नव्या पद्धतीनुसार भरती केली जाईल.