नवी दिल्ली: दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली आहे. इमामांनी याबाबत मोदींकडे चिंता व्यक्त केली आहे.


 


सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेली अटकेच्या या कारवाया पारदर्शक असाव्यात अशी मागणीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन इमामांनी ही भेट घेतली आहे.