राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना डाव्यांनी पसंती
राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डाव्यांनी पसंती दिल्याचं समजतं आहे. माकपचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी नुकतीच यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं समजतं आहे.
मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डाव्यांनी पसंती दिल्याचं समजतं आहे. माकपचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी नुकतीच यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं समजतं आहे.
शरद पवार यांच्याकडे मतं खेचण्याची क्षमता आहे, तसंच एनडीएची मतंही ते फोडू शकतात. त्याचबरोबर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनाही शरद पवारांना पाठिंबा देऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष पवारांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणार असल्याचं समजतंय.
आधी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होतं, पण आता ते मागे पडलं आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्यांची उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना पसंती होती. पण हमीद अन्सारींनी निवडणूक लढवायला नकार दिला आहे.